पुणे – लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा. या प्रमुख मागण्यांसाठी लिंगायत समन्वय समितीतर्फे आज सकाळी पुण्यातील विभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
शहरातील बाजीराव रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाची सुरुवात झाली. या मोर्च्यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजातील बांधव सामील झाले होते.