महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला

महाबळेश्वर – महाबळेश्वरमधील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जात असलेला लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला आहे. यावर्षीच्या पावसाच्या पहिल्या सत्रामध्ये या धबधब्याला तुफान पाणी दिसत असून लाल माती मिश्रित पाण्याचे लोट या धबधब्यातून वाहताना दिसत आहेत.

मूलतः महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील वेळ लेख येथे उगम असलेल्या वेळ नदीचा हा धबधबा असून महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील मेटगुताड येथून आणि महाबळेश्वर सातारा रस्त्यावरील मांस उतरत येथून लिंगमळा धबधब्याकडे जाता येते.

हा धबधबा पुढे वेण्णा नदी बनून केळघर मेढा येथे येतो. तसेच या वेण्णा नदीवरील कन्हेर येथे वेण्णा धरण बांधलेले आहे वेणा नदी ही कृष्णा नदीची उपनदी असून कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम साताऱ्याच्या पूर्वेला संगम माहुली येथे होतो.

लिंगमळा धबधबा पाहण्यासाठी वनखात्याने विशेष सोय केलेली असून धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर लाल फरसबंदी टाकलेली आहे तसेच अनेक ठिकाणी संरक्षक कठडे उभे केलेले आहेत. याशिवाय वनखात्याच्या कर्मचाऱ्यांची येथे गस्तही असते अत्यंत विलोभनीय असा दिसणारा हा धबधबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.