स्मार्टवॉच प्रमाणे आता स्मार्ट रिंग उपयोगात

घराचे लॉक खोलण्याबरोबरच अनेक कामे करणे शक्‍य

नवी दिल्ली – आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन आता स्मार्टवॉच प्रमाणेच स्मार्ट रिंगही उपयोगात आणण्यात येत असून या रिंगचा म्हणजेच अंगठीचा वापर करुन घराचे कुलूप उघडण्यापासून अनेक कामे सहजगत्या करणे शक्‍य होणार आहे.

या स्मार्ट अंगठीमध्ये डिजिटल डाटा स्टोअर करणे, हा डाटा मिळवणे आणि त्याचा ऍनालिसिस करणे अशा प्रकारच्या अनेक वैशिष्ट्यांचाही समावेश आहे. फ्राउनहोपर इन्स्टिट्यूट या संस्थेने ही स्मार्ट रिंग तयार केली असून घराचे कुलूप उघडण्याचे कामही रिंग करू शकणार आहे.

या रिंगमध्ये पैशाचे वॉलेट असणार असून हेल्थ इन्शुरन्स कार्डची सुविधाही देण्यात आली आहे. या रिंगमध्ये आर एफ आय डी तंत्रज्ञानाची स्मार्ट चीप लावण्यात आली आहे. त्यामुळे शॉपिंग करताना रिंगचा वापर करून पेमेंट करणेही शक्‍य होणार आहे. रिंग अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आली असून त्यासाठी टिकाऊ अशा धातूचा वापर करण्यात आला आहे.

रिंगमध्ये चिप अशाप्रकारे बसवण्यात येणार आहे की ज्या धातूपासून रिंग तयार करण्यात आली आहे त्याचा साइज एक मिलीमीटर असला तरी त्यातून सिग्नल मात्र परावर्तित होऊ शकणार आहेत आणि सर्व कामे स्मार्टपणे करणे शक्‍य होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.