पुणे : रांगोळ्यांच्या पायघड्या, फुलांची आरास, ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी उसळलेला गणेशभक्तांचा महासागर… अशा मंगलमय वातावरणात पुण्यातील मानाच्या गणपतींचा विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंतांच्या पथकाकडून कसाब गणपतीला वंदन करण्यात आले.