बॉलीवूडप्रमाणे मराठी इंडस्ट्रीमध्येही घराणेशाही

दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी धक्कादायक खुलासा केला

मुंबई – सुशांतसिंह राजपूतने नैराश्‍यातून आत्महत्या केली. त्याचा सर्वांनाच धक्‍का बसला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी स्वतःच्या निराश अवस्थेतील अनुभव सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली. काहींनी बॉलीवूडमध्ये कसे चुकीच्या पद्धतीने हाताळले जाते, याचे आरोपसत्र सुरू केले. यातच मराठी इंडस्ट्रीमध्येही अशीच घराणेशाही अस्तित्वात असल्याचा धक्कादायक खुलासा झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मराठी सिनेसृष्टीतले दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे त्यांनी फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करत यावर भाष्य केलं आहे. या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, ‘इंडस्ट्रीत कोणी नवीन आलं असेल, काही चांगलं काम करत असेल, कोणी पुढे जात असेल तर त्याचे पाय खेचण्याचं काम इथेही केलं जातं. एखाद्याची कला चांगली असेल, तो उत्तम अभिनेता असेल आणि अनेक वर्षे काम करत असेल तरी त्याला संपवण्याचा घाट इथलीच काही मंडळी करत असतात. ही मंडळी स्वत:ला अतिशहाणे समजतात. समोरून हे वार करत नाहीत, तर पडद्यामागून ही सूत्र हलवली जातात.’ अशी टीका त्यांनी केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.