मुंबई – सध्या सोशल मीडियावर ख्रिश्चन समुदायाचे सर्वोच्च धर्मगुरु, पोप फ्रान्सिस यांची चांगलीच पोस्ट चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी पोप यांनी ब्राझीलच्या एका मॉडेलचा चक्क बिकिनीमधील फोटो लाइक केला मात्र त्यांचा या एका लाईकमुळे सोशल मीडियावर त्या लाईकचा स्क्रीनशॉट प्रचंड व्हायरल होत आहे.
Pope Francis’ Instagram account appears to ‘like’ bikini model’s photo https://t.co/7LYT9sRiP6 pic.twitter.com/YeJR3BEap5
— New York Post (@nypost) November 17, 2020
मॉडेल नतालिया गरिबोटो ही स्कूल गर्लच्या वेशातील अत्यंत तोकड्या कपड्यांमध्ये दिसत आहे. याच फोटोला पोप यांनी आपला फोटो लाइक केले आता याचा स्क्रीनशॉट व्हायरल होत सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
At least I’m going to heaven https://t.co/w3nMYWVR6T
— Natalia Garibotto (@NataaGataa) November 13, 2020
यावर नेटकऱ्यांसह स्वतः नतालिया गरिबोटो हिनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. पोप यांनी लाइक केलेल्या स्क्रीनशॉटवर “किमान आता मी स्वर्गात जाईन”, अशी मजेशीर प्रतिक्रिया नतालिया गरिबोटो हिने दिली आहे.
दरम्यान नेटकऱ्यांकडून मोठ्या संख्येने कमेंट येत असून त्यामुळे ट्रोल झाल्यानंतर पोप यांच्या अकाउंटवरुन हा फोटो ‘अनलाइक’ करण्यात आला आहे.