विद्युतने केला अजब गजब स्टंट…

हॉलिवूडचा अॅक्‍शन, कॉमेडी स्टार जॅकी चॅन हे सध्या जगभरातील ओळखीचं नाव आहे. त्यांचा स्वतःचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. या बॉलिवूड सेलिब्रिटीही मागे नाहीत. अभिनेता विद्युत जामवाल त्यापैकीच एक आहे. सिने जगतात जॅकी चॅन यांचं फार मोठं योगदान आहे. सध्या ते वयोमानमुळे सिनेमांमध्ये फारसे दिसत नसले तरीही 2015 पासून प्रत्येक वर्षी ते जॅकी चॅन इंटरनॅशनल अ‍ॅक्शन फेस्टिव्हल आयोजित करतात. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील अ‍ॅक्शन फिल्म निर्मात्यांना सन्मानित केलं जातं. यावर्षी  हे फेस्टिव्हल 21 ते 27 जुलै पर्यंत होणार आहे.

 

चाहत्यांपैकी अभिनेता विद्युत जामवाल  यंदाच्या या फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या आहेत. विद्युतनं थोड्या हटके स्टाइलमध्ये या फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या. विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टंट व्हिडिओ शेअर केला आहे जो तुम्ही कदाचित याआधी कधीच पाहिला नसेल. या व्हिडिओमध्ये विद्युतनं जो स्टंट केला आहे तो पाहिल्यावर कदाचित तुम्हाला तो खूप सोप्पा वाटेलही पण तो अजिबात सोप्पा नाही.

यापूर्वी, सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये चॅलेंजेसची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मध्यंतरी आलेले आईस बकेट चॅलेंज असोत की फ्लिप द बॉटल चॅलेंज असो अशा सर्वांनाच नेटकरी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देताना दिसतात. अशातच सोशल मीडियावर #BottleCapChallenge असं करण्यात आलं होत या चॅलेजला विद्युत जामवाल आपल्या गजब अंदाजात पार पाडला होता.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)