पुणे -राज्यात द्रोणीय स्थितीमुळे हलक्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. परिणामी मध्य महाराष्ट्रातील थंडी पुढील दोन-तीन दिवस कमी राहण्याची शक्यता आहे.
राज्यात द्रोणीय स्थिती निर्माण झाली असल्यामुळे काही ठिकाणी पाऊस पडेल. राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्याचबरोबर गोवा आणि मराठवाड्याच्या काही भागांत आणि मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत सुद्धा किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने पारासुद्धा वाढला आहे.