शहरात पावसाच्या हलक्‍या सरी

पुणे – ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरात आगमन झालेल्या पावसाने अद्याप जायचे नाव घेतलेले दिसत नाही. सकाळी पावसाच्या हलक्‍या सरी झाल्या. त्याचबरोबर ढगाच्या दाटीमुळे दोन दिवस शहरात सूर्यदर्शनही झाले नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शहरात आगामी चोवीस तासांत मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

दिवाळी सुरु झाली तरी अद्याप पाऊस जायचे नाव घेत नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. पावसाच्या भीतीमुळे घराबाहेर पडणे सुद्धा अवघड होत आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अशीच परिस्थिती आहे. शुक्रवारी सुद्धा सकाळी शहरात पावसाच्या सरी झाल्या. त्यानंतर थोडी उघडीप दिल्यानंतर पुन्हा दुपारी काही सरी झाल्या.

त्यानंतर मात्र विश्रांती घेतली पण, ढगांची दाटी मात्र प्रचंड होती. त्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. पाऊस काही पडला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.