पुण्यात हलकासा पाऊस, दिवसभर ढगाळ वातावरण

पुणे  – थंडीची चाहूल लागत असतानाच, ऐन डिसेंबरमध्ये नागरिकांनी ढगाळ वातावरण अनुभवले. शहराच्या काही भागात हलका पाऊसदेखील झाला. तर, मुंबई आणि उपनगरांतदेखील काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला.

 

 

मागील 24 तासांत कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे होते. तर शहरात वातावरण ढगाळ होता. शुक्रवारी पिंपरी-चिंचवडसह वारजे, धनकवडी आदी भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला.

 

 

शनिवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुण्यात देखील आकाश अंशत: ढगाळ राहून हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.

 

 

पुणे येथे 31.6 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची आणि 18.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.