नवी मुंबई – दाक्षिणात्य स्टार विजय देवरकोंडा लायगर चित्रपटाद्वारे लवकरच बॉलिवूड डेब्यू करणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री अनन्या पांडे दिसणार आहे. दोघे मिळून या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या करत आहेत. नुकतेच विजय आणि अनन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका मॉलमध्ये पोहोचले, पण तेथील परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण झाले. एवढेच नाही तर यादरम्यान घटना देखील घडली यामुळेच हा शो अचानक रद्द करावा लागला.
जमाव अनियंत्रित झाला
रविवारी संध्याकाळी विजय आणि अनन्या नवी मुंबईतील सीझन मॉलमध्ये पोहोचले. या दोघांना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. सर्वांना विजयला भेटायचे होते. प्रेक्षकांच्या भल्या मोठ्या गर्दीत अचानक एका महिलेची प्रकृतीही बिघडली. गर्दीमुळे एका महिलेचा दम गुदमरला. त्या गर्दीतून त्या महिलेला मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढण्यात आले. महिलेची तब्बेत यावेळी काहीशी खालावली. आयोजकांनी तात्काळ हा शो रद्द केला.
विजय देवरकोंडाचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये आल्यानंतर लोकांमध्ये विजयबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे. सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनीही विजयवर क्रश असल्याचे स्पष्ट केले आहे. इतकंच नाही तर अनन्या पांडेने देखील खुलासा केला की ती विजयवर लाईन मारत होती.