पुणे – पत्नीच खून करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांनी सुनावली.
मोतीलाल हौसिलाल चव्हाण (वय 28, रा. गराडे सोमाडी रस्ता, ता. पुरंदर) अशी शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पत्नी राजकन्या (वय 22) यांचा खून केल्याप्रकरणात त्यांचे वडिल पंजाबराव भाऊराव चव्हाण (रा. माळेगाव, ता. कारंजालाड, जि. वाशिम) यांनी सासवड पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.
या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी 8 साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष आणि परिस्थितीजन्य पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला. या प्रकरणाचा महाजन यांनी केला. त्यांना सहायक पोलीस फौजदार शशिकांत वाघमारे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली.
मोतीलाल आणि राजकन्या यांचा विवाह सन 2015 मध्ये झाला. लग्नानंतर तिला सासरच्या मंडळीनी काही दिवस चांगले ठेवले. त्यानंतर माहेरहून पैसे आणण्याची मागणी करू लागले. तिने वडिलांना सांगितले. त्यानंतर वडिलांनी कही पैसे पाठविले. त्यानंतर 2016 मध्ये तिला मुलगी, दिरास मुलगा झाल्याने तिला त्रास देऊ लागले. त्यावेळी तिच्या वडिलांनी मुलीस सोन्याचे डुल आहे.
ते कमी किंमतीचे असल्याने तिला त्रास देण्यात आला. त्यानंतर 17 एप्रिल 2017 रोजी त्यांनी वडिलांना रात्री 9.30 फोन करून घरचे त्रास देत असल्याचे सांगितले. फोन अचानक बंद झाला. त्यानंतर 11.30 वाजता तिला रक्ताची उलटी झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ती मयत झाल्याचे सांगण्यात वडिलांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली. शवविच्छेदन अहवालात तिचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले.