Lifestyle | Skin Allergies : आजकाल बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, प्रदूषण, केमिकलयुक्त कॉस्मेटिक्स आणि ताणतणाव यामुळे स्किन अॅलर्जी (Skin Allergy) ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. मुरूम, खाज, लालसर चट्टे, पुरळ, त्वचेची जळजळ किंवा कोरडेपणा अशा तक्रारींमुळे दैनंदिन जीवनही त्रासदायक ठरते. बहुतेक वेळा स्किन अॅलर्जी सौम्य स्वरूपाची असते. अशा वेळी काही सोपे, सुरक्षित आणि नैसर्गिक घरगुती उपाय केल्यास आराम मिळू शकतो. हे उपाय त्वचेसाठी सौम्य असून, योग्य प्रकारे वापरल्यास दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते. काही घरगुती उपाय वापरुन तुम्ही यावर मात करु शकता. बेकिंग सोडा – स्किन अॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा स्वयंपाकघरातील असा एक पदार्थ आहे जो अनेक समस्यांवर लाभदायक ठरतो. पण बेकिंग सोडा वापरताना थोडी काळजी घेण्याची आवश्यकता असते. बेकिंग सोडा त्वचेत पीएच संतुलन राखण्यास मदत करतो. कसा करावा वापर? त्वचेवर बेकिंग सोडा वापरण्यासाठी सर्वप्रथम एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडं पाणी मिक्स करा. आता याची पातळ व मऊ अशी पेस्ट बनवून अॅलर्जी झालेल्या जागेवर लावा. १० मिनिटांनंतर ही पेस्ट धुवा. अॅलर्जीपासून मुक्ती मिळवण्यासाठी दिवसातून ३ ते ४ वेळा तुम्ही याचा वापर करू शकता. Skin Allergies कोरफडीचा गर- कोरफडीमधील औषधी गुणधर्मांच्या व्याप्तीबद्दल आपण सारेच जाणून आहोत. कोरफडीचा वापर अनेक गोष्टींत व अनेक प्रकारे केला जातो. कोरफडीचा ज्यूस देखील लोक तितक्याच प्रमाणात वापरतात. स्किन अॅलर्जीपासून सुटका मिळवण्यासाठी कोरफड एक रामबाम उपाय आहे. कसा करावा वापर? खाजेपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वप्रथम कोरफड घेऊन त्वचेवर लावा. जर तुमच्याकडे कोरफडीचे झाड नसेल तर तुम्ही बाजारातून विकत आणून किंवा अॅलोवेरा जेलचा देखील वापर करू शकता. ३० ते ४० मिनिटे कोरफडीचा गर अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावून ठेवा. काहीच दिवसांत खाज व जळजळीच्या समस्येपासून मुक्ती मिळेल. खोबरेल किंवा नारळ तेल – खोबरेल तेल स्किन केयरसाठी सर्वात उत्तम तेल आहे. यामध्ये मॉइस्चराइजिंग गुणधर्म असतात जे अॅलर्जी झालेल्या काळात त्वचेची रक्षा करतात. इतकंच नाही तर नारळ तेल अॅलर्जीमुळे होणारी खाज देखील थांबवतं. कसा करावा वापर? एका वाटीत थोडं खोबरेल तेल घ्या आणि ५ सेकंदासाठी ते गरम करा. हे कोमट तेल त्याजागी लावा जिथे तुम्हाला अॅलर्जी झाली आहे. लक्षात ठेवा, तेल अॅलर्जी झालेल्या ठिकाणी फक्त लावा चुकूनही मालिश करू नका. १ तास तेल तसंच राहू द्या. या तेलाचा वापर तुम्ही ३ ते ४ तासांनी पुन्हा करू शकता. अॅप्पल सायडर व्हिनेगर – अॅप्पल सायडर व्हिनेगरचा वापर लोक सामान्यत: वजन कमी करण्यासाठी आणि पचनक्रियेसंबंधित त्रास दूर करण्यासाठी केला जातो. पण हे फक्त वजन कमी करणं किंवा डायजेशन ठीक करण्यासाठीच नाही तर उत्तम स्किन केयर एजंटही आहे. यामध्ये अॅसिटीक अॅसिड असतं, जे त्वचेवरील खाज व अॅलर्जी कमी करतं. पण नाजूक त्वचेवर याचा वापर करू नये. कसा करावा वापर? एक कप गरम पाण्यात एक टिस्पून अॅप्पल सायडर व्हिनेगर मिसळा. आता कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण अॅलर्जी झालेल्या ठिकाणी लावा. आता हे सुकण्यासाठी ठेवा आणि काही वेळानंतर थंड पाण्याने जागा धुवून घ्या. हा उपाय तुम्ही दिवसातून कमीत कमी २ वेळा करू शकता. हे देखील वाचा… Foods to Avoid For Health: नव्या वर्षात आरोग्यदायी राहायचं असेल तर आहारातून या गोष्टी टाळा, वर्षभर राहाल तरुण Keerthy Suresh: फक्त घरच्या जेवणावरही अगदी फिट! अभिनेत्री किर्ती सुरेशचा साधा पण प्रभावी फिटनेस मंत्र Apple : भारतात ‘अॅपल फिटनेस+’ची सुरुवात; कोणत्या डिव्हाइसवर चालणार? किंमत एकदा पाहाच…