लाइफलाइन बंदच; पीएमपीचा निर्णय दि. 1 नंतरच

सर्वसामान्य नागरिकांसाठी सेवा तूर्त बंदच राहणार : पालिका आयुक्‍त

पुणे – शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा पीएमपी बससेवा 31 एप्रिलपर्यंत बंदच असणार आहे. सध्या ही सेवा फक्‍त अत्यावश्‍यक सेवांसाठी सुरू आहे. त्यामुळे अनेक खासगी कार्यालयांना शासनाने मुभा दिली असली, तरी पीएमपीची सेवा ठराविक वेळेत आणि मर्यादित असल्याने या कर्मचाऱ्यांना खासगी वाहनांचाच वापर करावा लागणार आहे. पीएमपी सुरू करण्याचा निर्णय आता 1 मेनंतरच घेतला जाणार आहे.

नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, हॉटेल तसेच रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल देण्यास महापालिकेने मुभा दिली आहे. रात्री 11 वाजेपर्यंत ही पार्सल सेवा घरपोच पुरवणाऱ्या स्विगी, झोमॅटोसारख्या ई-कॉमर्स कंपन्यांच्या माध्यमातून देता येणार आहे. तसेच नागरिकांना हॉटेलमध्ये जाऊन पार्सल आणण्यास मुभा असणार नाही.एकाच इमारतीत एकापेक्षा जास्त पार्सल सेवा द्यायची असल्यास बिल्डिंगच्या गेटवर सोसायटीच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातूनच हे पार्सल देता येणार आहे.

गाड्यांवरूनही पदार्थांचे पार्सलच
रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर अन्नपदार्थांचे सेवन करण्यास मनाई असेल. या ठिकाणी फक्‍त पार्सल घेऊन जाण्यास मुभा राहील. सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत हे पार्सल देता येईल. या ठिकाणी असलेल्या कामगारांनाही कोविड निगेटिव्ह असल्याचा अहवाल जवळ बाळगावा लागेल. तसेच या ठिकाणी करोना नियंत्रण प्रतिबंधात्मक नियम न पाळल्यास संबंधित आस्थापना तसेच नागरिकांकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.