जीवनगाणे : सुखाचा पेला   

अरुण गोखले 

माणूस आयुष्यभर सुखाच्या शोधात फिरत असतो. तो ते सुख कधी एखाद्या वस्तूत, धन दौलतीत, तर कधी भोग विलासात शोधतो. पण तरीही त्याला खरं सुख मिळतच नाही. कारण ही अशी मिळणारी सुखं थोड्या कालावधीची असतात. त्याने माणूस खऱ्या अर्थाने सुखी होत नाही तर उलट अनेकदा त्यामुळे तो जास्त चिंतीत होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माणसाला वाटत असते कि घरदार, जोडलेली माया, माणसे, जमीन जुमला, ऐशोआरामाची साधने, सुखसोयी मिळणे म्हणजे सुख. पण त्याच्या हे लक्षात येत नाही कि खरं सुख किंवा समाधान या बाह्य वस्तूत नाही. ते त्याच्या मनात आहे. वस्तूंनी आनंद सुख होते, ते प्रथम मनाला, घरात नवा टीव्ही व्ही आला की सर्वात प्रथम आपण हेच म्हणतो की झालं बाबा मनासारख, आला टीव्ही. आपण जेव्हा रेडिओवरचे एखादे गाणे ऐकतो त्यावेळी ते गाणे कानाला गोड लागते, मनाला भावते आणि मग आपल्या जीवाला सुखावते.

पण तेच जर आपले डोके दुखत असेल तर मात्र आपल्याला तेच सुखदायक वाटणारे संगीत नकोसे वाटते, आपण अगदी आवडीचा जरी कार्यक्रम असला तरी तो बंद करतो. हजारो रुपयांच्या गादीवरही आपल्याला सुखाची झोप येत नाही. असं कां? ह्याचा विचार व्हायला हवा.

सुखाचा सदरा घातलेला माणूस जगाच्या पाठीवर कुठेही शोधला तरी सापडत नाही. कारण प्रत्येकाचा सुखाच्या कल्पनेचा पेला हा अर्धा रिकामा आहे असं म्हणून जो तो रडत असतो. रिकाम्या पेल्यापेक्षा निदान तो माझ्यासाठी अर्धा तरी भरलेला आहे ह्यात सुख समाधान मानणारं विचारी विवेकी मन असणारा माणूस हाच खरा सुखी अन समाधानी असतो.

नाही त्याचं दु:ख करत बसण्यापेक्षा आहे त्याचा आनंद घेण्याची खुबी लक्षात आली, की मग त्या अर्ध्या भरलेल्या पेल्याचेही भरुन सांडणाऱ्या पेल्या इतकेच समाधान वाटते. कारण सुख समाधान हे वस्तूत नाही, ते साधन सामुग्रीत नाही, तर ते आपल्या मनात आहे .

सुख हे समाधानी वृत्तीनं, विवेकानं मिळवायचं असतं, हे खरं तर प्रत्येकानच समजून घ्यायला हवं. त्यासाठीच समर्थांनी सुख देणाऱ्या आणि ते नाही म्हणून रडवणाऱ्या मानवी मनालाच हा विवेकी सांगावा दिला आहे. ते सांगतात जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधूनी पाहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)