पुणे: चार वर्षाच्या चिमुकलीला खोलीत नेवून बलात्कार करून सत्तार, चाकूने गळा चिरून तिचा खून करणाऱ्याला नराधमाला जन्मठेप आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी सुनावली.
अजय ऊर्फ दशरथ अजून शिंदे (वय 31, रा. करंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे त्याचे नाव आहे. 4 वर्षाच्या मुलीच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी अकरा साक्षीदार तपासले. तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अजय चौधरी यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस कॉन्स्टेबल नितीन पवार यांनी मदत केली.
फिर्यादींने 26 जुलै 2011 रोजी चार वाजल्यापासून ती मुलगी बेपत्ता झाली होती. शोध घेऊनही ती सापडली नाही. दुसऱ्या दिवशी ती हरविल्याबाबतची तक्रार पोलिसात देण्यात आली. 29 जुलै रोजी घराबाहेरील चाळीत गर्दी दिसली. बंद खोलीतून वास येत असल्याची चर्चा होती. ती खोली चार दिवसापासून बंद होती. तेथे राहणारा अजय कोठेतरी निघून गेला होता. पोलिसांना बोलविण्यात आले. तेथे त्या मुलीचा मृतदेह पोत्यात आढळून आला. दरम्यान तपासात त्याने मुलीवर बलात्कार करून खून केल्याचे निष्पन्न झाले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात ठेवला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र दाखल केले