पालघर – सन 2017 मध्ये आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी येथील एका इसमाला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.विशेष (पॉक्सो) न्यायालयाच्या न्यायाधीश आदिती कदम यांनी मंगळवारी दिलेल्या निकालात आरोपी जगदीश फागु राय याला 10,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सदर मुलगी एका भिकारी दाम्पत्याची आहे.
विशेष सरकारी वकील जयप्रकाश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले की, पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील भीक मागण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असत. 26-27 मे 2017 च्या मध्यरात्री पालघरमधील सातिवली परिसरातील गावदेवी मंदिराजवळ ते दोघे झोपले असताना ही मुलगी निसर्गाच्या हाकेला उत्तर देण्यासाठी गेली.
त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या आरोपीने तिला निर्जन स्थळी नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला असता ती आरोपीच्या ताब्यात व रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली.त्यानंतर रितसर पोलिस तक्रार दाखल करण्यात आली.