Life Certificate: जर तुम्ही तुमचे लाइफ सर्टिफिकेट 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत सबमिट करायला विसरलात, तर काळजी करण्याची गरज नाही. मात्र, पेन्शन मिळविण्यासाठी जीवन प्रमाणपत्र वेळेवर सादर करणे आवश्यक आहे. बहुतांश सरकारी संस्था जीवन प्रमाणपत्र उशिरा सादर करण्यास परवानगी देतात. म्हणजेच निवृत्तीवेतनधारक अंतिम मुदतीत जीवन प्रमाणपत्र सादर केले नसले तरी ते त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.
जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास काय होईल?
UIDAI नुसार, पेन्शनधारकाने 30 नोव्हेंबरपर्यंत जीवन प्रमाणपत्र सादर न केल्यास डिसेंबरपासून पेन्शन बंद केली जाईल. सर्व केंद्र आणि राज्य सरकारी निवृत्ती वेतनधारकांनी दरवर्षी नोव्हेंबरमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
जीवन प्रमाणपत्र उशिरा सादर करता येईल का?
होय, अंतिम मुदतीनंतरही तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. यासाठी तुम्ही खाली नमूद केलेले पर्याय वापरू शकता.
ऑफलाइन मोड:
तुम्ही बँक, पोस्ट ऑफिस किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता.
ऑनलाइन मोड:
जीवन प्रमाण ॲप पोर्टल: डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन तयार केले जाऊ शकते.
डोअरस्टेप बँकिंग सेवा: अनेक बँका पेन्शनधारकांसाठी मोफत घरोघरी सेवा देत आहेत. ज्याद्वारे ते घरबसल्या आपले प्रमाणपत्र सादर करू शकतात.
जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास विलंब झाल्यास काय होईल?
निवृत्ती वेतन प्रणालीमध्ये जीवन प्रमाणपत्र अद्ययावत होताच, पुढील निवृत्तीवेतनासह पेन्शनची थकबाकी प्राप्त होईल. जीवन प्रमाणपत्र तीन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ सादर न केल्यास अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय पेन्शन मिळणार नाही.