लायसन्सचा कोटा वाढविला

आता दररोज 300 जणांना ड्रायव्हिंग लायसन्स

पुणे – वाहन चालविण्याचा पक्‍का परवाना (लायसन्स) देण्याची क्षमता प्रादेशिक परिवहन परिवहन कार्यालयाने 120ने वाढविली आहे. आता 300 दररोज जणांना परवाना मिळणार आहे. हा निर्णय प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी घेतला असून सोमवारपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

भोसरी येथील आयडीटीआरमध्ये यापूर्वी 120 उमेदवारांना कायमस्वरूपी वाहन चालविण्याचा परवाना देण्यात येत होता. मात्र, वाहन चालविण्याच्या परवान्याची मागणी आणि “वेटिंग’ लक्षात घेता परवाने देण्याची क्षमता खूपच कमी होती. अनेकदा परवान्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या बाबींची पूर्तता करुन देखील नागरिकांना पक्का वाहन परवाना (लायसन्स) काढण्यासाठी पूर्वनियोजित वेळ आणि तारीख मिळत नव्हती. त्यामुळे शिकाऊ (लर्निंग) परवान्याची मुदत संपूनदेखील नागरिकांना वाट पाहावी लागत होती. त्यामुळे दि. 5 पासून “हलके मोटार वाहन’ वर्गाच्या पक्‍क्‍या परवान्याचा कोटा वाढविण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.