नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतीय आयुर्विमा महामंडळ शेअर बाजारात 1 लाख 30 हजार रूपयांची गुंतवणूक करेल, असे एलआयसीचे प्रमुख सिद्धार्थ मोहंती यांनी म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या नव्या गौप्यस्फोटामुळे सोमवारी शेअर बाजारात मेाठी पडझड अपेक्षित असल्याच्या पार्श्वभूमीवर एलआयसीकडून करण्यात आलेल्या या घोषणेला मोठे महत्व दिले जात आहे.
ते म्हणाले की एलआयसीने शेअर्समध्ये या वर्षी सुमारे ३८ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, जी एका वर्षापूर्वी याच कालावधीत रु. २३ हजार ३०० कोटी इतकी होती. एलआयसीने पहिल्या तिमाहीत इक्विटी मार्केटमधील गुंतवणुकीतून रु. १५५०० कोटींचा नफा कमावला आहे. त्याच्या गुंतवणुकीतील नफा तिमाही-दर-तिमाही १३.५ टक्क्यांनी जास्त होता. एलआयसीने गेल्या संपुर्ण आर्थिक वर्षात शेअर बाजारात १.३२ लाख कोटींची गुंतवणूक केली होती.