नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने आपल्या पॉलिसीधारकांना मोठी भेट दिली. कोरोनाच्या महासाथी दरम्यान पॉलिसीधारकांच्या अडचणी कमी करण्यासाठी LIC ने सांगितले की, पॉलिसीधारक पॉलिसी मॅच्योरिटीचा दावा करण्याचे कागदपत्रे देशभरात आपल्या जवळच्या कोणत्याही एलआईसी ऑफिसमध्ये महिन्याच्या शेवटीपर्यंत जमा करू शकता.
एलआईसीच्या या निर्णयाने त्या पॉलिसीधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे, ज्यांची पॉलिसी मैच्योर झाली आहे. एलआईसीने ट्विट करून याची माहिती दिली. एलआईसीने सांगितले, देशभरात त्यांचे 113 विभागीय ऑफिस, 2,048 शाखा, 1548 लहान कार्यालय आहेत. या व्यतिरिक्त त्यांचे 74 कस्टमर झोन आहेत. जिथे पॉलिसीधारकांना त्यांच्या पॉलिसीच्या मैच्योरिटी दाव्याचे अर्ज स्वीकारले जातील. यामुळे कोणत्याही ही शाखेतून घेतलेली पॉलिसीचे मैच्योर झाल्यावर त्याचा दावा करण्यासाठीचा अर्ज कोठे ही जमा करता येवू शकतो.
निरीक्षण करण्यासाठी सुरू केली ही सुविधा :
एलआईसीने सांगितले की, ही सुविधा सध्या निरीक्षण करण्यासाठी सुरू केली आहे आणि लगेच अमलात आणली आहे. ही सुविधा 31 मार्चला समाप्त होत आहे. एलआईसीचे सध्या 29 कोटीपेक्षा जास्त पॉलिसीधारक आहेत.
कंपनीने सांगितले, सध्या तरी पॉलिसीच्या दाव्यांच्या अर्जांचे निरसन हे त्यांच्या मुख्य शाखेकडून केले जाईल. यानुसार दस्ताऐवजांना शाखेच्या डिजिटल पद्धतीने व्यवस्थित जमा केले जाईल. त्यांनी सांगितले, सर्व अधिकारी आणि विशेष करून अशा प्रकारच्या दाव्यांचे निरसन प्रक्रियेसाठी अधिकृत केले गेले आहे.
लाँच केली नवी पॉलिसी :
एलआईसीने याच आठवड्यात सोमवारी एक दमदार पॉलिसी लाँच केली आहे. एलआईसीने बचत प्लस नावाची पॉलिसी लाँच केली आहे. यामध्ये सुरक्षेसोबत बचतीची सुविधा आहे. या योजनेच्या परिपक्वतेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. जर पॉलिसीच्या मैच्योरिटीच्या अगोदर पॉलिसीधारकाचे निधन झाले, तर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळणार. ही पॉलिसी सिंगल प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम देय मोडसाठी सम एश्योर्ड ऑन डेथ निवडण्याचा पर्याय दिला जातो.