मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजे एलआयसी कंपनीची आज शेअर बाजारावर नोदणी झाली. कंपनीच्या शेअरची इश्यू किंमत 949 रुपये होती. एनएसईवर नोंदणी झाल्यानंतर या शेअरचा भाव 867 रुपयावर आला. दिवसभर किंमत इश्यू प्राईसपेक्षा कमी पातळीवर होती.
विदेशी गुंतवणूकदारांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्याचा ग्रे मार्केट प्रीमियम सातत्याने घसरत होता. नुकत्याच सूचीबद्ध झालेल्या आयपीओ समभागांपैकी कंपनीचा ग्रे मार्केट प्रीमियम सर्वात कमी होता. एलआयसीचा स्टॉक 5 ते 10 टक्के सवलतीने लिस्ट केला जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत होते.
एलआयसीकडे 25 कोटी विमाधारक आहेत आणि विमा बाजारपेठेचा सुमारे दोन तृतीयांश हिस्सा या कंपनीकडे आहे. एलआयसीच्या देशात 2000 शाखा, एक लाख कर्मचारी आणि 28.60 पॉलिसी आहेत. 65 वर्षीय या कंपनीची संपत्ती सुमारे 500 अब्ज डॉलर इतकी आहे.