कोलकाता हिंसाचारप्रकरणी गृह मंत्रालयाचे निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शोवेळी मंगळवारी तुफान राडा झाला. यावेळी भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले.

दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज गृह मंत्रालयाने लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाला पश्चिम बंगालमध्ये निवडणुकी दरम्यान ( 700 CAPF ) केंद्रीय सशस्त्र पोलीस दल तैनात करण्यात यावे अशी मागणी केली आहे. तसेच या पत्रात अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शोवेळी मंगळवारी झालेल्या हिंसाचाराचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.