धनकवडी, दि. 4 (प्रतिनिधी) -धनकवडी येथील कानिफनाथ तरुण मंडळ आणि माजी नगरसेविका अश्विनी भागवत यांच्यामार्फत “लोकनेते शरदचंद्र पवार बहुउद्देशीय भवन’ येथे नागपंचमी दिवशी “चला खेळूया मंगळागौरी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नऊवारी साडी परिधान करीत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कानिफनाथ तरुण मंडळानी महिलांना अनेक भेटवस्तूंचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष सागर भागवत यांनी केले होते. महिलांकरीता आकर्षक भेट वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामधील विजेता महिला सविता धोत्रे, नेहा मुळे, राजश्री जुन्नरकर, लता बुगडे, मंजरी साडेकर, रूपा पवार यांना “लकी ड्रॉ’द्वारे पैठणी साडी भेट मिळाली.