सोनार बंगाल बनवू; कोलकात्यात मोदींचं आश्वासन

कोलकाता – बंगालने परिवर्तनासाठीच ममता दीदींवर विश्वास ठेवला. पण, दीदी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विश्वासघात केला. या लोकांनी बंगालचा विश्वास तोडला. या लोकांनी बंगालला अपमानित केले असे सांगून बदलाची वेळ आली आहेभारत मातेच्या आशिर्वादाने आपण राज्याला सोनार बंगला बनवू, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली सभा कोलकातातील ब्रिगेड मैदानावर झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल कॉंग्रेससह डावे पक्ष आणि कॉंग्रेसवरही टीकेची झोड उठवली. मोदी म्हणाले, बंगालच्या सुपुत्रांनी एक भारत, श्रेष्ठ भारताची भावना देशभरात रुजवली. एक देश एक संविधान, एक निशान, एक पंतप्रधान अशी घोषणअ देत प्रअणअंचे बलीदान देणारा सुपूत्रही याच भूमीने दिला. या भूमीने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात प्राण फुंकले. बंगालच्या या भूमीने ज्ञान आणि विज्ञानाच्या क्षेत्रात भारताची मान उंचावली. या भूमिला ममता बॅनर्जी यांनी धोका दिल्याची टीका मोदी यांनी केली.

परिवर्तनासाठी बंगालने ममता दीदींवर विश्वास टाकला. पण, त्यांनी आणि त्यांच्या बगलबच्चांनी बंगालचा विश्वासघात केला. बंगालला अपमानित केले. इथल्या मुलींवर अत्याचार केले. ब्रिगेड मैदानावरील जनतेचा आवाज ऐकल्यानंतर येत्र परिवर्तन होणार असल्याबद्दल कुणालाही शंका राहणार नाही, असंही मोदी म्हणाले.

या ब्रिगेड मैदानावरून तुम्हाला “आशोल पोरिबोरतो’ची ग्वाही देण्यासाठी आलो आहे. मी तुम्हाला विश्वास देण्यासाठी आलोय. विश्वास बंगालच्या विकासाचा. बंगालमधील परिस्थिती बदलण्याचा. बंगालमध्ये गुंतवणूक वाढवण्याचा. बंगालचं पुनर्निर्माण करण्याचा. विश्वास बंगालच्या संस्कृती रक्षणाचा. मी ग्वाही देतो इथल्या तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी, इथल्या भगिनी आणि मुलींच्या विकासासाठी आम्ही तास काम करू. कष्ट करण्यात कोणताही कुचराई करणार नाही, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.