पलक्कड – केरळ मध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आला तर या राज्यात आम्ही लव्ह जिहादच्या विरोधात कायदा करू अशी ग्वाही प्रदेश भाजप अध्यक्ष के सुरेंद्रन यांनी दिली आहे. ते म्हणाले की या राज्यात सध्या धर्मांतरासाठी विवाहाच्या माध्यमाचा जो वापर केला जात आहे त्यात ख्रिश्चन समाजालाहीं लक्ष्य केले जात आहे. त्यांनाही या कायद्यापासून मोठे संरक्षण मिळू शकते.
उत्तरप्रदेश पेक्षाहीं केरळात लव्ह जिहादचे प्रमाण सर्वाधिक आहे असा दावाही त्यांनी केला. भाजप शासित उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदे केले आहेत. तसेच कायदे केरळातही लागू करण्याची गरज आहे असे त्यांनी नमूद केले. इंडियन युनियन ऑफ मुस्लिम लीगशी आघाडी करण्यास भाजप उत्सुक नाही असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. कॉंग्रेस, कम्युनिस्ट आणि मुस्लिम लीग यांच्याशी संबंध तोडणाऱ्यांना भाजप मध्ये प्रवेश दिला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.