चंद्रपूर- 50 वर्षांचा बालेकिल्ला अबाधित ठेवू, तरुणांच्या व पदविधरांच्या समस्येवर तोडगा शोधण्याची जबाबदारी आता आमची असेल, असं वक्तव्य नागपूरचे विद्यमान महापौर व पदविधर मतदारसंघ नागपूर विभागाचे उमेदवार संदीप जोशी यांनी केलं. ते भद्रावती येथे बोलत होते.
नागपूरचे विद्यमान महापौर संदीप जोशी पदविधर मतदारसंघ नागपूर विभागाचे उमेदवार आहे. त्यानिमित्ताने त्यांनी भद्रावती येथे भाजप कार्यालयात प्रचार बैठक घेण्यात घेतली. यावेळी तरुण कार्यकर्त्यांना तसेच मतदारांना त्यांनी संबोधित केले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावभाऊ भोंगळे, जिल्हाउपाध्यक्ष चंद्रकांतजी गुंडांवर,जिल्हा संघटन महामंत्री संजयगजपुरे, माजी जिल्हाध्यक्ष अनु जमाती विजय वानखेडे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, म. रा. शि. प. नागपूर विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे, माजी नगराध्यक्ष सुनिल नामोजवार, संजय वासेकर, अनंता ताठे, नगरसेवक प्रशांत डाखरे आणि इतर भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.