संपूर्ण करवीर नगरी हरित करूया; जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर: स्वछ शहर, सुंदर शहर हरित करण्यासाठी आपल्या जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करणे आवश्यक आहे.लोकमाध्यमातून आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून आपण ही करवीर नगरी हरित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज आहे. असे झाले तर कोल्हापूरकडे पर्यटकांची रीघ लागेल असे उद्गार जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले.
गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४९व्या पुष्पप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते. फक्त महावीर गार्डनमध्येच नाही तर कोल्हापूर शहरातील प्रत्येक उद्यानात असे प्रदर्शन भरवले पाहिजे तरच लोकांना पर्यावरणाचे महत्त्व समजेल अशी अशा महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी व्यक्त केली.
गार्डन्स क्लब च्या रोजेट या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.पुढील वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या गार्डन्स क्लबने आजपर्यंत पर्यावरण या संपूर्ण सृष्टीला व्यापून टाकणाऱ्या गोष्टीकडे विविध अंगांनी अभ्यास करणाऱ्या आणि लोकांसमोर आणल्या आहेत. तीन दिवसीय या महोत्सवामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा, व्याख्याने, सजावटी यांची रेलचेल असणार आहे.
 पुष्प प्रदर्शनांमध्ये नर्सरी बगीच्याचे सामान व खाद्य पदार्थांचे विविध स्टॉल्स असणार आहेत. या स्टॉलचे उद्घाटन नगरसेवक राहुल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी १५ डिसेंबर रोजी लहान मुले व जेष्ठांसाठी चित्रकला स्पर्धा, पर्यावरण विषयक लघुपट स्पर्धा, बोटानिक फॅशन शो असे कार्यक्रम होतील.
या सर्व स्पर्धांचा बक्षीस समारंभ सोमवारी सायंकाळी ६ वाजता अध्यक्षा सौ.शांतीदेवी.डी पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे आणि शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे प्रमुख अतुल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. पर्यावरण विषयक कार्यशाळा, प्रात्यक्षिके, घरगुती बाग-बगीचा, किचन कंपोस्ट, पर्यावरणपूरक निवारा अश्या विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यान पर्यावरण प्रेमींना ऐकायला मिळणार आहे.
 पर्यावरणप्रेमी साठी दिवसभर प्रदर्शन खुले असून या तीन दिवसीय भरगच्च महोत्सवाचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी असे आवाहन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत यांनी केले.यावेळी किंग ऑफ द शो अण्णाभाऊ साठे सूत गिरणी,आजरा क्वीन ऑफ द शो संजय घोडवत ग्रुप यांना प्रदान करण्यात आले.बक्षीस वितरण समारंभ आयआयआयडी चे चेअरमन संदीप घोरपडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
उद्घाटन प्रसंगी महापौर ऍड. सुरमंजिरी लाटकर नगरसेवक राहुल चव्हाण,उमा इंगळे, प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड,उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, सीमा कदम,राज अथणे यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आदी उपस्थित होते.
Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)