सातारा (प्रतिनिधी) – राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना फ्लेक्स बाबत नगरपालिकेची परवानगी घेतली असताना जाणून बुजून आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याचे काम पोलिसांनी केले आहे.
पोलिसांकडे आम्ही परवानगी मागितली होती मात्र त्यांनी का परवानगी दिली नाही, हे माहिती नाही. परंतु गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ प्रसंगी रस्त्यावर उतरून पोलिसांविरोधात मोर्चा काढू असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ते शासकीय विश्रामगृह येथे बैठकीनिमित्ताने आले असताना बोलत होते.