मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कायम सोशल मीडियावर त्यांचा ट्विट आणि गाण्यांमुळे चर्चेत असतात. राज्यातील सरकारवरही त्या नेहमीच ट्विट द्वारे टीका करत असतात.
आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम ….
मी पुन्हा येत अहे !!!— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 18, 2021
त्यांच्या सोशलवरील पोस्टमुळे त्यांना नेहमीच ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो. यातच त्यांनी त्यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर ट्विट केले आहे. नुकतेच एक ट्वीट करत एक घोषणा केली आहे. मात्र, या ट्वीटवरून त्या नेमकं काय करणार आहेत, हे स्पष्ट होत नाही आहे.
‘आओ कुछ तूफ़ानी करते है, कल शाम…. मी पुन्हा येत आहे !!!’, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यांचा या ट्विटमुळे नेमकं रात्री त्या राजकीय विषयावर बोलणार आहे की , नव्या गाण्याचा आगामी अल्बमची घोषणा करणार, याबद्दल कयास बांधले जात आहेत.