वास्तू बनवा ‘इकोफ्रेंडली’

व्हिंटेज व पर्यावरणस्नेही उत्पादनांचा वापर करा

साध्या गोष्टी व सोप्या उपायांचा अवलंब करून तुमचे घर पर्यावरणस्नेही घरामध्ये परावर्तित करा, टिकाऊपणाचा स्वीकार हा तुमच्या घरामध्ये तुम्ही अंगीकारू शकणा-या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक आहे. टिकाऊ घराच्या निर्मितीबद्दल काही प्रचलित गैरसमज आहेत. मात्र, हे काम तुम्हाला वाटते त्यापेक्षा फारच सोपे आहे! यासाठीची संसाधने ऑनलाईन सोयीस्करपणे उपलब्ध असल्याने, तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वत:च्या व्यक्तिगत शैलीने पर्यावरणस्नेही सजावट करू शकता. थोडय़ा संशोधनाद्वारे, तुमच्या घराच्या रचनेची संपूर्ण प्रकिया पर्यावरणस्नेही उत्पादनांची निवड करण्यापासून ते तुमच्या घराची डिझाईन वर्धित करेपर्यंत आपल्या पर्यावरणावर सकारात्मक प्रभाव पाडते. खालील सोप्या, पण परिवर्तनीय संकल्पनांचा अंगीकार करून तुमचे घर हरित बनवा आणि शाश्वत घराचे मालक बना.

नेहमीच पुनर्वापर आणि पुनर्चक्रण तुम्हाला तुमचा अमूल्य पैसा वाचविण्यामध्ये मदत करतेच, शिवाय त्याद्वारे तुमच्या अपेक्षा बरहुकुम सर्वोत्कृष्ट व्हिंटेज लूक देखील प्राप्त होतो. फ्ली मार्केट्स, अ‍ॅन्टीक स्टोअर्स इ. मधून रंगीबेरंगी पर्यावरणस्नेही उत्पादने आणून तुम्ही तुमच्या घरामध्ये नवचैतन्य आणू शकता.

व्हिंटेज व पर्यावरणस्नेही उत्पादनांचा वापर करा 
असे घर बनवा, जे स्टायलिश असेल आणि ज्यामध्ये कार्बनचे अस्तित्व अत्यंत कमी असेल. तुम्ही व्हिंटेज फॅब्रिक्स, व्हिंटेज फर्निचर, नॉन-डाय लिनन्स, अत्यंत कमी रसायने असलेल्या रंगांचा वापर, नैसर्गिक फायबर्स, सोलर पॅनेल्स, रिक्लेम्ड लाकडाचा वापर केलेले लाकडी फ्लोअरिंग इ. यांचा वापर करत तुमचे हरित ध्येय प्राप्त करू शकता.

सजावटीकरिता स्मार्ट ‘डू इट यूअरसेल्फ’ अ‍ॅक्सेसरिजचा वापर करा
तुमच्या आताच्या वस्तूंचे नूतनीकरण करा आणि साध्याशा संकल्पनांनी तुमचे जुने फर्निचर परीवर्तित करा, जसे की तुमच्या टेबलवरील कापड बदला किंवा नवीन घाला. नवीन पेंटसह जुना ड्रेसर आधुनिक बनवणे इ. ‘डू इट यूअरसेल्फ’ तंत्रांचा स्टायलिश अ‍ॅक्सेसरिज बनविण्याकरिता वापर करा, जसे की तुमचे घर अधिक पर्यावरणस्रेही बनविण्याकरिता पोटॅटो चिप्स रॅपरपासून वेस्टबास्केट बनवू शकता, जेणेकरून तुमच्या घराचा एक लहानसा कोपरा अधिक पर्यावरणस्नेही बनेल.

घरातील हवेचा दर्जा वाढवा
ओलावा येण्यापासून अटकाव, घरात खेळत्या हवेचा वावर वाढविणे आणि नकोशी धूळ व धुरापासून प्रतिबंध केल्यास तुमच्या घरातील हवेचा दर्जा वाढतो. तुमच्या घरातील हवेचा दर्जा वाढविण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे पेंट्स, एअर फ्रेशनर्स, क्लीनिंग प्रोडक्ट्स, पेस्टिसाईड्स व फर्निचर सामग्रीच्या नैसर्गिक पर्यायांचा वापर करणे.

थंडावा राहू द्या
पाणी गरम करण्याच्या गरजांकरिता सोलार यंत्रणेसारख्या पर्यायांचा वापर करून उन्हाची तीव्रता कमी करा, तिचा वापर करून घ्या आणि वीज वाचवा. तुम्ही थर्मोकॉमिक पेंटस्रे छताला कोटिंग देखील करू शकता, जेणेकरून उष्णता कमी होईल आणि घरात थंडावा राहील. कूल रुफ टाईल्स सारख्या थंड रुफ टाईल्स लावून घ्या, ज्या सूर्यकिरणे परावर्तित करू शकतील आणि आतील तापमान थंड राहण्यास मदत करतील. शिवाय, ऊर्जेचीही बचत होऊ शकेल.

नैसर्गिक एअर फ्रेशनर म्हणून रोपांचा वापर करा
घरात रोपे असणे हा तुमच्या घरामध्ये ताजेपणा आणण्याचा एक उत्तम मार्ग आहे. रोपे तुमच्या घराच्या सौंदर्यामध्ये देखील भर घालतात आणि ताण मोठय़ा प्रमाणावर कमी करतात. फुलांची रोपटी जीवनामध्येही रंग भरतात आणि सुगंधाने मन प्रसन्न करतात.

नैसर्गिक उजेडाचा वापर करा
हवेशीर जागा व उजेड येण्याकरिता खिडक्या जास्त असल्या पाहिजेत. तुम्ही आरसे व प्रतिबिंब पडणारे पृष्ठभाग यांचा देखील योग्यरीत्या वापर करून दिवसा कृत्रिम लायटिंगवर अवलंबून राहणे कमी करू शकता. ब्राईट टाईल्स लावा, जेणेकरून तुमच्या घरांमध्ये सूर्यप्रकाश प्रतिबिंबित होईल.

पर्यावरणस्नेही बाथरुम्ससह पाणी वाचवा
पाणी वाचवणारे शॉवरहेड्स व टॉयलेट्स वापरा. पाणी वाचविण्याकरिता गळणारे नळ त्वरित दुरुस्त करा किंवा बदला. ऊर्जा कार्यक्षम वॉटर हीटर्स टँकलेस गरम पाण्याच्या हीटरची निवड करा, जो ऊर्जेची बचत करण्याबरोबरच संपूर्ण घराला गरम पाणी पुरविण्यात मदत करेल. गार्डनला पाणी देताना पाण्याची बचत करा किंवा तुमच्या लँडस्केप गार्डन्सची डिझाईन करताना इंटीरिअर डेकोरेटरला त्याची अशी रचना करायला सांगा की, पाण्याची बचत होईल. तुम्ही छतावर पडणारे पाणी डेनेजमध्ये वापरू शकता, जे पावसाचे पाणी साठविण्याच्या तंत्राद्वारे सहज वापरता येऊ शकते आणि ते नंतर वापराकरिता खूपच उपयुक्त असेल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.