हा वाद कायमचा मिटावा

सरसंघाचलाकांनी केले निर्णयाचे स्वागत

नवी दिल्ली  – सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्या प्रकरणातील निकालाचे स्वागत केले आहे. हा वाद कायमचा मिटावा अशीच आमची इच्छा होती. आता अयोध्येत सर्व मिळून मंदिर उभारणी करतील असे त्यांनी म्हटले आहे. आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की कोर्टाने सर्व बाजू आणि तथ्य पाहून आज हा निर्णय दिला आहे. तो सत्य आणि न्यायाला धरून आहे. त्यामुळे आता हा वाद कायमचा संपुष्टात येईल.

आता यापुढील सर्व बाबी प्रोसीजर नुसार पुर्ण होतील असेही त्यांनी म्हटले आहे. या निकालाकडे कोणाचा तरी विजय किंवा कोणाचा तरी पराभव या दृष्टीकोनातून पाहिले जाऊ नये असेही त्यांनी म्हटले आहे. अयोध्या प्रकरणात निर्णय आल्यनंतर आपण आता काशी आणि मथुरेचा विषय हाती घेणार आहात काय असे विचाराता ते म्हणाले की आम्ही कोणतेही आंदोलन हाती घेत नसतो आम्ही केवळ चारित्र्य संपन्न व्यक्तीमत्व घडवण्याचे काम करतो.

अयोध्येतील राम मंदीर उभारणीच्या आंदोलनाला संघ परिवाराने मोठे समर्थन दिले होते व त्यांच्या अनेक संघटनांनी या चळवळीत प्रत्यक्ष भागही घेतला होता. संघ परिवाराने अयोध्या हा कायद्याचा विषय नव्हे तर देशातील कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा विषय आहे अशी भूमिका सातत्याने घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.