‘मतदार राजांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू’

सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांचे प्रतिपादन

वाघोली – थेऊर तालुका ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मान्य करत यापुढील काळात मतदार राजांनी दाखविलेला विश्वास सार्थकी लावू, असे आश्वासन सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे यांनी दिले.

थेऊरमधील विजयी उमेदवारांच्या सभेत काकडे बोलत होते. काकडे म्हणाले की, मतदारांनी निवडून दिलेल्या उमेदवारांच्या सहाय्याने गावात आम्ही विविध समाजोपयोगी कामे करणार असून मतदारांनी दाखवलेला विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करून दाखवू. सर्वांच्या मदतीने गावामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून विविध योजना आणण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास काकडे यांनी व्यक्त केला.

नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. महातारीमाता ग्रामविकास पॅनलचे प्रमुख महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे व पॅनलचे मार्गदर्शक माजी सरपंच बाबासाहेब काकडे, चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त दत्तात्रय कुंजीर, हवेलीच्या माजी सभापती चंद्रभागा काकडे, लक्ष्मणआबा कुंजीर, नितीन ज्ञानोबा कुंजीर, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष मोहन कुंजीर, माजी उपसरपंच सुदाम गावडे व राज्य कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे व पंचायत समितीचे माजी सदस्य हिरामण काकडे यांच्या नेतृत्वाखालील चिंतामणी ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ लढत झालेली पाहण्यास मिळाली.

येथील ग्रामपंचायत निवडणुकीत चिंतामणी ग्रामविकास पॅनेलने दहा जागा जिंकल्या तर विरोधातील महातारीमाता ग्रामविकास पॅनेलने सात जागांवर विजय मिळवला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.