मुंबई – करोना लसीकरण मोहिमेसाठी राज्य सरकारांना स्वत:चे ऍप विकसित करायला परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने आणि सर्वाधिक कार्यक्षमतेने सर्वाधिक लसीकरण होत आहे,Let the states develop a vaccination “app”; Chief Minister Uddhav Thackeray’s important demand to the याकडे त्यांनी या पत्रात पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. त्यात ते म्हणतात, सध्या लसीकरणसाठी केंद्र सरकारच्या कोविन या ऍपचा नागरिक वापर करतात. सध्या आपण राज्य सरकारांमार्फत 18 ते 45 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे कोविन ऍपवर देशभरातील नागरिकांच्या नोंदणीचा ताण येत आहे. त्यामूळे या वयोगटातील नागरिकांचा नोंदणीचा एकदम ताण आल्यास पहिल्या दिवशी त्याचे कामकाज बंद पडले तसे ते बंद पडण्याचा धोका आहे, याकडे त्यात लक्ष वेधण्यात आले आहे.
त्यामुळे केंद्र सरकारच्या आरोग्य खात्याला जोडणारे स्वतंत्र ऍप प्रत्येक राज्याला विकसित करू द्यावे किंवा भारत सरकारने कोविन ऍप विकसित करून ते प्रत्येक राज्याला द्यावे, असे त्यात सुचवण्यात आले आहे.