दुकाने सुरू करू द्या

व्यापारी महासंघाचे पालिका आयुक्‍तांना निवेदन

पुणे – लॉकडाऊनमुळे शहरातील अनेक दुकाने तब्बल 70 दिवसांपासून बंद आहेत. व्यापारी भीषण अर्थिक टंचाईला सामोरे जात असून, आता दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन व्यापारी महासंघाने पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना दिले आहे.

यावेळी अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळिया, उपाध्यक्ष रतन किराड, हेमंत शहा, नितीन काकडे, अमृत सोळंकी, मोहन पटेल, भारत शहा, नीलेश फेरवाणी, बोगावत, शिवलाल पटेल, रवी जेठवानी, शंकर पटेल आणि ऋषी खंडेलवाल आदी उपस्थित होते.

सकारात्मक निर्णय देण्याचे आश्‍वासन गायकवाड यांनी दिल्याचे सांगण्यात आले. मध्यवर्ती सर्व पेठांसह शिवाजी रस्ता येथील व्यापाऱ्यांची पुरवठा साखळी खंडित झाली असून, सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामुळे दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.