‘कोरोनाचे संकट दूर होऊ दे’; तिने नृत्यातून केली विठ्ठल चरणी आळवणी

हडपसर(प्रतिनिधी) – आज कोरोनाचे विश्वावर ओढावलेले संकट दूर कर अशी आळवणी बा…विठ्ठलाच्या चरणी  आपल्या नृत्यातून सोनिया संतोष भानगिरे हिने केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांची पुतणी तसेच संतोष भानगिरे यांची कन्या सोनिया संतोष भानगिरे हिने विठ्ठल भकत्तीत तल्लीन होऊन हे नृत्य सादर केले.

“लहान पणापासून नृत्याची आवड होती,त्यामुळे मी मागील आठ वर्षापासून गुरू पल्लवी सचिन देशमुख यांच्या कलासिद्धी नृत्यालयात भरतनाट्यम चे शिक्षण घेत आहे. यापूर्वी श्रीलंका व दुबई येथे आयोजित आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेतही विठ्ठलाच्या या अभंगावर नृत्य सादर केले होते. त्यावेळी सर्वांना आनंद झाला होता तोच आनंद आजही झाला आहे. सलग दोन वर्षे कोरोनामुळे असंख्य भाविक वारकऱ्यांना पायी वारी करता आली नाही. विठ्ठलाने हे संकट दूर करावे, ही भावना मनी ठेवून आज मी हे नृत्य सादर केले.
-सोनिया संतोष भानगिरे

आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने सासवड रोडवरील दिवे घाट येथील भव्य विठ्ठल मूर्तीच्या समोर हे नृत्य सादर करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.