चीन सीमेवर नक्‍की काय चाललंय याची देशाला माहिती द्या- राहुल गांधी

राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदींना सूचना

नवी दिल्ली: भारत-चीन सीमेवर नक्‍की काय चालले आहे याची पंतप्रधान मोदींनी देशाला माहिती द्यावी, असे आवाहन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. देश एकीकडे करोनाशी लढत असताना दुसरीकडे चीन सीमेवर निर्माण झालेल्या तणावाविषयी सरकार काहीच माहिती देणार नसेल तर लोकांमध्ये विविध प्रकारच्या शंकाकुशंका निर्माण होत आहेत. त्याचे निराकरण सरकारी पातळीवरूनच झाले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन यांच्यात निर्माण झालेल्या तणावाविषयी देशभर चिंता निर्माण झाली असून याविषयी सरकारने देशातील जनतेला विश्‍वासात घेऊन त्याविषयीची माहिती दिली पाहिजे, अशी मागणी दोनच दिवसांपूर्वी कॉंग्रेस पक्षाने केली होती.

आज पुन्हा हाच विषय राहुल गांधी यांनीही उपस्थित करीत सरकारला त्यावर बोलण्याची सूचना केली आहे. मात्र, सरकारकडून चीनविषयक स्थितीवर अजून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.