हायपोटेन्शन समजून घेऊ (भाग १)

दरवर्षी 28 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड हार्ट डे अर्थात जागतिक हृदय दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. यानिमित्ताने एकविसाव्या शतकातील सर्वांत मोठा आजार असलेल्या हृदयविषयक आजारांबाबत जनजागृती घडवून आणली जाते. जीवनशैलीतील बदल आणि प्रत्येकाला त्याच्या व्यवसायाला साजेशी आहाराची पद्धती याशिवाय त्याने उत्तम हृदयारोग्यासाठी काय करावे, याबद्दल मार्गदर्शन केले जाते. हृदयाचे आरोग्य म्हटले की, सहसा चर्चा होते ती हृदयक्रिया बंद पडणे किंवा उच्च रक्‍तदाबाची. मात्र, लो ब्लड प्रेशरची समस्याही तितकीच महत्त्वाची आहे. त्याकडे वेळेत लक्ष दिले नाही, तर होणारे दुष्परिणाम फारच घातक असतात. त्याविषयी…

रक्‍तदाबाबाबतचा माझा इतक्‍या वर्षांचा अनुभव म्हणायचा झाला, तर मी आतापर्यंत जवळपास 10 लाख लोकांचा रक्‍तदाब मोजला असेल; आणि विश्‍वास ठेवणे अवघड जाईल पण यातील जवळपास 30% लोकांचा रक्‍तदाब कमी आढळून आला असेल! रक्‍तदाब कमी असण्याकडे फार लक्ष दिले जात नाही. पण ज्यांचा रक्‍तदाब कमी असतो अशा व्यक्‍तींच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होतो. उच्च रक्‍तदाब आणि कमी रक्‍तदाब या दोन्हींचा धोका वयापरत्वे होणाऱ्या नैसर्गिक बदलांमुळे वाढतो. जसे वय वाढते तसे रक्‍तवाहिन्यांमध्ये तयार होणाऱ्या गुठळ्यांमुळे हृदयाच्या स्नायूंना आणि मेंदूला होणारा रक्‍तपुरवठा कमी होतो. वयाच्या 65 वर्षांनंतर जवळपास 10 ते 20% व्यक्‍तींमध्ये शरीराच्या विशिष्ट हालचालींमुळे कमी होणारा रक्‍तदाब दिसून येतो. सहसा उच्च रक्‍तदाबाकडेच जास्त लक्ष दिले जाते आणि कमी रक्तदाब दुर्लक्षिला जातो – सावत्र भावंडच जणू!

आज मी कमी होणाऱ्या रक्‍तदाबाबद्दल का बरे बोलत आहे? कारण कालच 35 वर्षांची वृषाली माझ्या क्‍लिनिकमध्ये आली होती. तिच्या कमी रक्‍तदाबाकडे कोणी लक्षच देत नाही अशी तिची तक्रार होती. तिला कायमच गरगरल्यासारखे व्हायचे, डोके दुखायचे, थकवा यायचा. तज्ज्ञांचे म्हणणे पडले की यात काळजी करण्यासारखे काही नाही. पण रोजची कामे करायलाही त्रास व्हायला लागला, तर त्याकडे लक्ष द्यायलाच हवे.
वृषालीकडे पहात मी म्हणाले, काय होतंय तुला?
निराशेने मान हलवत ती म्हणाली, मॅडम, माझा रक्‍तदाब कायमच कमी असतो. असे का? याबाबतीत कोणाला काहीच कळत नाहीये असं वाटायला लागलंय!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रक्‍तदाब म्हणजे काय? 
किती खोलात जावे याचा थोडा विचार करून मी तिला रक्‍तदाबाबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. रक्‍तदाबामध्ये दोन आकडे असतात. पहिला आकडा जो जास्त असतो त्याला म्हणतात सिस्टोलिक दाब – यावेळी हृदय रक्‍तवाहिन्यंमध्ये रक्त भरते. दुसरा आकडा जो कमी असतो तो डायास्टोलिक दाब दर्शवतो – दोन ठोक्‍यांमध्ये ज्यावेळी हृदय विश्राम अवस्थेत असते, त्यावेळचा हा दाब. सर्वसाधारण निरोगी माणसाचा रक्तदाब 120 / 80 (सिस्टोलिक/ डायास्टोलिक) इतका भरतो. जेव्हा रक्‍तदाब 90/ 60 पेक्षा कमी भरतो, तेव्हा त्यास कमी रक्‍तदाब (हायपोटेन्शन) असे संबोधतात.

निरोगी व्यक्‍तींमध्ये रक्‍तदाब कमी असेल, नेहमीच कमी राहात असेल आणि काही लक्षणे दिसत नसतील तर काळजीचे कारण नसते आणि काही उपचार घ्यायची गरज नसते. खेळाडू, नियमित व्यायाम करणाऱ्या व्यक्‍ती, वजन आटोक्‍यात ठेवलेल्या व्यक्‍ती, धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती यांमध्ये बऱ्याचदा रक्‍तदाब कमी दिसून येतो. काही त्रास होत नसेल तर हा कमी असणारा रक्‍तदाब त्यांना फायदेशीरच ठरतो. वृद्ध व्यक्तींमध्ये मात्र एखादा आजार असल्याचा तो संकेत असू शकतो आणि अशा व्यक्‍तींमध्ये रक्‍तदाब कमी झाल्यास हृदय, मेंदू आणि शरीरातील काही महत्त्वाच्या अवयवांचा रक्‍तपुरवठा कमी होऊ शकतो.

मग मला लक्षणे का दिसून येतात? वृषालीने विचारले. 
मी पुढे म्हणाले, जेव्हा रक्‍तदाब अचानक कमी होतो तेव्हा मेंदूला रक्‍तपुरवठा कमी होऊन गरगरणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसतात. आडवे असताना (झोपले असताना) उठून बसणे किंवा बसले असताना अचानक उभे रहाणे यामुळे हे घडू शकते .
कमी रक्‍तदाबाचा आणखी एक प्रकार . यात फार काळ उभे राहिल्यामुळे पायांमध्ये रक्‍त साकळून रक्‍तदाब कमी होतो. अतिशय तीव्रपणे रक्‍तदाब कमी होऊन तीव्र त्रास होण्याला तर्रीीेंरसरश्र डूपलेशि म्हणतात.

वृषाली थोडीशी गोंधळलेली दिसली; बाबत पुन्हा अधिक तपशिलात सांगायची तिने विनंती केली. मी म्हणाले,  रक्‍ताभिसरण संस्थेतील बिघाडामुळे तर मज्जासंस्थेतील बिघाडामुळे होते. बाकी या दोन्हीत फार फरक नाही. जेव्हा आपण उभे राहतो, तेव्हा रक्‍त पायाच्या दिशेने ओढले जाते. यामुळे रक्‍तदाब कमी होतो. पण निरोगी व्यक्‍तींच्या शरीरात अशावेळी रक्‍तदाब फार कमी होऊ नये म्हणून हृदयाचे ठोके वाढवले जातात, रक्‍तवाहिन्याही आकुंचन पावतात व कमी झालेला रक्‍तदाब वाढतो (पूर्वपदाला येतो). हे जर घडले नाही किंवा फार सावकाशीने घडले तर रक्‍तदाब कमीच राहतो  व चक्‍कर येऊ शकते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)