मुंबई – भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मगणी केलीय.
“तिला जगू द्या…” हे गाणं पोस्ट करत अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे मागणी केली आहे. या गाण्याला 1 मिलियन्स पेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, सोशल मीडियावरही हे गाणे चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी या गाण्यावरुन अमृता फडणवीस यांना ट्रोलही केले. मात्र, अमृता यांनी टीकाकारांचे आणि कौतुक करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.
आज भाऊबीजेला माझ्या सर्व भावांना एकच मागणं आहे-
तिला शिकू द्या
जगण्याचा हक्क तिलाही घेऊ द्या
समाज भक्कम करायचा असेल तर
तिला आधी सक्षम होऊ द्या.#दिवाळी च्या शुभेच्छा देत असताना प्रत्येक भगिनीला समर्पित आहे माझे गीत-तिला जगू द्या👉 https://t.co/eOY2BE0O8D #bhaidooj2020 #BhaiDuj pic.twitter.com/17cfvdQE9A— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) November 16, 2020
काय म्हणाल्या अमृता फडणवीस
‘तिला जगू द्या… या गाण्याचं आपण कौतुक केलंत, त्यामुळेच त्याला गेल्या 2 दिवसांत तब्बल 10 लाख व्ह्यूज मिळाले असून आपण गाण्याला दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपणा सर्वांचे आभार, तसेच, माझं कौतुक करणाऱ्या आणि माझ्यावर टीका करणाऱ्या सर्वांचं मी आभार मानते. लवकरच, मी नवीन काहीतरी घेऊन आपल्या भेटीला येईल.’
https://www.facebook.com/mahesh.tilekar.5/posts/1874822905992268
तत्पूर्वी, या टीकाकारांमध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता महेश टिळेकर देखील आहेत. “गायी म्हशीच्या हंबरण्याचा आवाज एकवेळ लोक सहन करतील पण हा आवाज सहन होत नाही”, असं म्हणत त्यांनी अमृत फडणवीस यांना खरंच गाता येतं का? असा सवाल केला होता.