विद्यार्थ्यांसह नागरिकांना दिले योगाचे धडे

नेवासाफाटा – आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त नेवासा तालुक्‍यातील विविध शाळांमध्ये योग साधनाचे धडे गिरविण्यात येऊन योगाचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये योग शिक्षकांमार्फत प्रात्यक्षिकांद्वारे जनजागृती करण्यात आली. नेवासा येथील बदामबाई हायस्कूल प्रांगणात पहाटेच्या सुमारास पतंजली योग समितीचे योगशिक्षक भाऊसाहेब भोंदे व शंकरराव गायके यांनी उपस्थित नागरिकांना कपालभाती, अनुलोमविलोम, भ्रामरीप्राणायम, सूर्यनमस्कार, मकरासन, वज्रासन, बाह्यप्राणायाम सादर करत प्रत्येक प्राणायम व योग किती शरीरासाठी व चांगल्या आरोग्यासाठी लाभदायक व नवसंजीवनी देणारे आहे हे आपल्या व्याख्यानातून बोलतांना विषद केले.

यावेळी बाळासाहेब आढाव, भामाबाई आढाव, प्रकाश गुंदेचा, राजेंद्र वाघ, बबनराव आलवने, अमृता नळकांडे, पत्रकार सुधीर चव्हाण उपस्थित होते. यावेळी नेवासा तालुक्‍यात योग व प्राणायम विषयी जनजागृती करणारे नेवासा येथील योगशिक्षक मोहिनीराज उर्फ बाळ जाधव यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी डॉ. रविंद्र कानडे, ओमप्रकाश शर्मा, राजेंद्र पिंपळे, एकनाथराव भगत, राजेंद्र लळीत, ऍड. अनिल लोखंडे, भगवान गुजराथी, राहुल म्हस्के, ज्ञानेश्वर जाधव, तृप्ती लळीत, भिकाजी खोसे, सचिन सावंत यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्ञानोदय इंग्लिश स्कूल येथेही योग प्राणायमचे धडे शिक्षकांमार्फत देण्यात आले.

नेवासा खुर्द जिल्हा परिषदेच्या सेमी इंग्लिश स्कूलच्या वतीने योगशिक्षक आण्णासाहेब पवार यांनी विद्यार्थ्यांना योग व प्राणायामचे महत्व सांगितले. तर ज्ञानेश्वर मंदिर प्रांगणात योग समितीच्या वतीने युवा योग प्रशिक्षकांनी योगाचे धडे दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.