प्रथम पसंतीक्रम प्रवेशाकडे 5,637 विद्यार्थ्यांची पाठ

पुणे – पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावी प्रवेश प्रक्रियेत प्रथम पसंतीक्रमाचे कनिष्ठ महाविद्यालय मिळालेले असतानाही 5 हजार 637 विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे.

प्रवेशासाठी पहिल्या गुणवत्ता यादीसाठी 63 हजार 566 अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या फेरीसाठी 48 हजार 701 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर करण्यात आला होता. यात प्रथम पसंतीक्रमाद्वारे प्रवेश उपलब्ध झालेल्या 24 हजार 364 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यातील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.

पहिल्या फेरीत प्रत्यक्षात एकूण 26 हजार 520 विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्‍चित केला आहे. 21 हजार 969 विद्यार्थ्यांनी या फेरीत प्रवेशच घेतलेला नाही. आता येत्या 22 जुलै रोजी प्रवेशासाठी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांनी त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून ठेवावी, असे आवाहन अकरावी प्रवेश समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)