नवी दिल्ली – वाहनचालकांकडून अनेक वेळा ‘लेन कटिंग’चे नियम धाब्यावर बसवण्यात येतात. यामुळे अनेकदा अपघात होताना दिसून येतात. यामध्ये खासगी वाहनांसोबत शासकीय बसेसही लेनकटींग करताना दिसतात. परंतु, पोलिसांकडून खासगी वाहनांवर कारवाई करण्यात येते. परंतु, सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये महिलेने केलेल्या कृत्याचे सर्वत्रच कौतुक होत आहे.
राज्य परिवहनच्या एका बससमोर ती महिला क्षणभरही डगमगता उभी राहिली होती. या व्हिडिओमध्ये राज्य परिवहन बस लेनकटींग करत दुसऱ्या लेनमध्ये घुसली. यावेळी स्कुटीवर असलेल्या त्या महिलेने बसला रस्ता देण्यास नकार दिला. आणि गाडीसमवेत बससमोर उभी राहिली. बस थोडी जवळ नेऊनही ती महिला थोडीही डगमगली नाही. हे पाहून अखेर चालकाने आपली बस योग्य रस्त्यावरून पुढे नेली. या महिलेच्या धाडसाचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.