नवी दिल्ली : देशातील करोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली असली तरी देशातील मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरांतील रुग्णांच्या संख्येचा वेग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे.
With 48,268 new #COVID19 infections, India's total cases surge to 81,37,119. With 551 new deaths, toll mounts to 1,21,641.
Total active cases are 5,82,649 after a decrease of 11,737 in last 24 hrs.
Total cured cases are 74,32,829 with 59,454 new discharges in the last 24 hrs. pic.twitter.com/Z7QiRzYa8W
— ANI (@ANI) October 31, 2020
दिल्लीत तर करोनाची तिसरी लाट सदृश्य स्थिती असल्याचे मत आरोग्य विभागाने नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या चोवीस तासांत देशात नव्याने ४८,२६८ रुग्ण आढळून आले तर ५५१ जणांचा मृत्यू झाला.
नव्या रुग्णांच्या नोंदीमुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ८१,३७,११९ वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या १,२१,६४१ वर पोहोचली आहे. तसेच ५९,४५४ रुग्ण व्यवस्थित बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४,३२,८२९ वर पोहोचली आहे.