‘खडकवासला’तून विसर्ग केला कमी

पुणे -खडकवासला धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून सोडण्यात येणार विसर्ग कमी केला आहे. धरणातून 18 हजार 491 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दरम्यान, रात्री उशीरा विसर्ग आणखी कमी करून 9,416 क्‍युसेक करण्यात आला आहे.

गुरुवारी खडकवासला धरण परिसरात 2 मिमी, पानशेतमध्ये 13 मिमी, वरसगावमध्ये 13 मिमी आणि टेमघरमध्ये 45 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खडकवासला धरणातून सकाळी 9 वाजता 45 हजार 624 क्‍युसेकने पाणी सोडण्यात येत होते. त्यानंतर टप्पाटप्याने पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता 33 हजार 506 क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले. यानंतर संध्याकाळी 27 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.