मुंबई – मोबईलवर इंटरनेटचा वापर ही काही आता चैनीची गोष्ट राहिली नसून ती एक जीवनावश्यक गोष्ट झाली आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे दिसून आले आहे. मोबाईल डेटा स्पीडमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत.
डेटा स्पीड ट्रॅक करणारी कंपनी उक्लोच्या स्पीडटेस्ट ग्लोबल इंडेक्स सप्टेंबर 2020 च्या अहवालानुसार भारतात सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड हा 12.07 एमबीपीएस इतका आहे आणि अपलोड स्पीड 4.32 एमबीपीएस आहे. तर लेटेन्सी रेट एमएस इतका आहे. जगभरातील सरासरी मोबाईल डेटा स्पीड हा 35.26 एमबीपीएस (डाऊनलोड स्पीड) इतका आहे, अपलोड स्पीड 11.22 एमबीपीएस आणि लेटेन्सी रेट 34 एमएस इतका आहे.
दक्षिण कोरिया नंबर एकवर मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत दक्षिण कोरिया हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियामध्ये डाऊनलोड स्पीड 121 एमबीपीएस, सरासरी अपलोड स्पीड 18.81 एमबीपीएस आणि लेटेन्सी रेट 34 एमएस इतका आहे. फिक्सड लाइन ब्रॉडबॅंडच्या बाबतीत दक्षिण कोरिया 14 व्या स्थानी आहे. यात द. कोरियात 155.39 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड आणि 147.89 एमबीपीएस इतका सरासरी अपलोड स्पीड मिळतो. तर तिथला लेटेन्सी रेट 22 एमएस इतका आहे.
फिक्स्ड लाइन ब्रॉडबॅंडच्या बाबतीत भारताची स्थिती थोडी बरी आहे. या लिस्टमध्ये भारत 70 व्या क्रमांकावर आहे. यामध्ये भारतात सरासरी 46.47 एमबीपीएस डाऊनलोड स्पीड, 42.43 एमबीपीएस अपलोड स्पीड मिळतो, तर लेटेन्सी रेट एमएस इतका आहे. परंतु या लिस्टमध्येदेखील घाना, मोलडोव्हा आणि मालटासारखे देश भारताच्या पुढे आहेत.