सविंदणे -कवठे येमाई (ता. शिरूर) परिसरातील ढाकीवस्ती येथे लावण्यात आलेल्या
पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.कवठे यमाई परिसरातील शेतातील ऊस तुटून गेल्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी जागा शिल्लक नाही, त्यामुळे तो मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागला आहे.
ढाकीवस्ती परिसरात मेंढपाळाच्या घोडी, बकऱ्यावर बिबट्याने हल्ले करून ठार केले होते. त्यामुळे ढाकीवस्तीत वनपरिक्षेत्र आधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरा लावण्यात आला होता.
या पिंजऱ्यामध्ये तीन वर्ष वयोगटाचा बिबट्या अडकला आहे. त्याला तातडीने माणिकडोह येथील निवारण केंद्रात दाखल करण्यात आले आहे.