#Video : कोंबड्यांच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याची निवारा केंद्रात रवानगी

-संजोक काळदंते

माणिकडोह : अहीनवेवाडी येथील शेतकरी किरण कैलास अहीनवे यांच्या घराजवळील कोंबडीच्या खुराड्यात मंगळवारी(दि.१८) सकाळी बिबट्या बंद झाल्याची घटना घडली व या बिबट्याची खुराड्यातुन सुटका करुन पिंज-यात घालुन माणिकडोह  निवारा केंद्र येथे हलविण्यात आले असल्याचे ओतुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.सी.येळे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माणिकडोह बिबट निवारा टीम या ठिकाणी पोहचली व बिबट्याला बेशुद्ध करून खुराड्याबाहेर काढले, भयभीत झालेल्या नागरिकांनी व शेतकर्यांनी यावेळी सुटकेचा श्वास घेतला. कविता किरण अहीनवे या कोंबड्यांना खुराड्यातुन बाहेर काढण्यासाठी गेल्या असता कोंबड्यांच्या खुराड्यामध्‍ये बिबट्या असल्याचे पाहिले यावेळी त्या भयभीत झाल्या व त्यांचे पती किरण अहीनवे यांना याविषयी सांगितले.

या घटनेची माहिती किरण अहीनवे यांनी फोनवरुन वनविभागाला दिली यावेळी लगेचच वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी बी.सी.येळे वनपाल चैतन्य कांबळे,सचिन मोढवे तसेच वनरक्षक जराड, पवार व वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचून याविषयी माणिकडोह निवारण केंद्रशी संपर्क साधला असता माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे डॉ.अजय देशमुख डॉ. महेंद्र ढोले यांचे पथकाच्या मदतीने सदर बिबट्याची या खुराड्यातून सुखरुप सुटका केली व त्याला माणिकडोह विबट निवारण केंद्रांमध्ये उपचारासाठी पिंजऱ्यात घालून नेण्यात आले हा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे अडीच वर्षे असल्याचे वनविभागाने सांगितले. दरम्यान ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांना समजताच येथे मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी झाली होती.

बिबट्याला बेशुद्ध करून खुराड्याबाहेर काढण्यात आले…

या बिबट्याची खुराड्यातुन सुटका करुन पिंज-यात घालुन माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथे हलविण्यात आले आहे.

Posted by Dainik Prabhat on Tuesday, 18 December 2018


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)