सातारा -शाहूनगर हद्दीत बुधवारी (दि. 3) रात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळला असून हा बिबट्या एका बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा बिबट्या कुत्र्याचे पिल्लू घेऊन पळून गेल्याचे यामध्ये दिसत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
शाहूनगर परिसरातील एका बंगल्याच्या गेटजवळ बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. चक्रीवादळ आणि पावसाची संततधार यामुळे परिसरातील लोक आपापल्या घरात होते. या वातावरणामुळे बिबट्या या परिसरात आला असण्याची शक्यता वर्तविण्यात आली. एका बंगल्याच्या बाहेर असलेले कुत्र्याचे पिल्लू घेऊन पळून जाताना हा बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.