पाटणजवळ कळपात घुसून बिबट्याकडून बकरीचा फडशा

म्हसवड भागातील मेंढपाळ स्थलांतरित

मल्हारपेठ – नावडी येथील शिवारात मेंढ्यांच्या कळपात घुसून बिबट्याने बकरीचा फडशा पाडल्याची घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

नावडी गावच्या शिवारात बिबट्याने हैदोस घातला आहे. गेल्या महिन्यांपासून मारूल हवेली विभागातील बिबट्याचा मोर्चा आता नावडीच्या शिवारात वळला आहे. या शिवारात सध्या म्हसवड भागातील मेंढपाळ स्थलांतरित झाले असून शिवारात मुक्काम सुरू आहे. प्रामुख्याने ऊस शेतीक्षेत्रात ऊसतोड सुरू आहे.

लपून छपून बिबट्याकडून आतापर्यंत हल्ले सुरू होते. आता मात्र दिवसाढवळ्या मेंढ्यांच्या कळपात घुसून बिबट्याने बकरीचा फडशा पाडला आहे.

दोन दिवसांपूर्वी सटवाई नावाच्या शिवारात रात्री अंकुश मोरे यांच्या मालकीच्या कळपातील बकरीवर झडप घालून पळवून नेले. ते आता जागता पहारा ठेवू लागलेत. बिबट्याच्या दहशती-मुळे शिवारात ऊस तोड मजूर भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. याबाबतची माहिती वनविभागाला दिली असताना अधिकारी फिरकले देखील नसल्याची माहिती शेतकर्‍याने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.