केडगावमध्ये बिबट्या

संग्रहित छायाचित्र

नगर  – मागील महिन्यात बुरूडगाव परिसरात बिबट्या आल्याची चर्चा होती. त्यानुसार वनविभागाने पाहणी केली होती. त्यानुसार वनविभागाने पाहणी केली होती.परंतु बिबट्याचे ठसे आढळून आले नाही. परत आता गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास व शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास केडगाव परिसरातील रेल्वे उड्डाणपूल-देवी रस्त्यावर बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भितीदायक वातावरण तयार झाले आहे.

वनविभागाच्या पथकाकडून केडगाव परिसराची पाहणी करण्यात आली. जंगल कमी होत चालल्याने बिबट्याने शिकारीसाठी शहरी भागात धाव घेतल्याचे चित्र गेल्या काही वर्षापासून पाहवायास मिळत आहे. केडगावचे नागरिक व नगरसेवक मनोज कोतकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्या आल्याची माहिती दिली. याची दखल घेत वन विभागाच्या पथकाने केडगाव परिसरात पाहणी केली. पंरतु बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत.मात्र या परिसरात यामुळे भितीचे वातावरण आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here